अहिल्यानगर (प्रतिनिधी) - अहिल्यानगर जिल्ह्यात प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी नगर तालुक्यातील देहरे येथील महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या ८.७४ हेक्टर क्षेत्राचा विचार व्हावा असे निवेदन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नगर तालुका उपाध्यक्ष महेश काळे व सुरज धनवटे यांनी नवी दिल्ली येथे खासदार लंके यांना दिले आहे.
खा. निलेश लंके यांनी संसदेत अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याबाबत लक्ष वेधले होते. खा. लंके यांच्या या पाठपुरावयाला यश आले असून महाविद्यालयासाठी जागा निच्छित करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.
या संदर्भात सदर मंजूर महाविद्यालयासाठी पंचायत समितीचे माजी सदस्य व्हि.डी काळे पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण लांडगे पाटील,निलेश लंके प्रतिष्ठान देहरे चे अध्यक्ष डॉक्टर अनिल लांडगे, आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुनील बालवे मेजर व निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली देहरे येथील महाराष्ट्र शासनाच्या गट नंबर ३०० मधील ८.७४ हेक्टर क्षेत्राचा विचार व्हावा असे निवेदन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नगर तालुका उपाध्यक्ष महेश काळे व सुरज धनवटे यांनी नवी दिल्ली येथे खासदार लंके यांना दिले आहे.
या निवेदनात काळे यांनी म्हणले आहे की, सदर ८.७४ हेक्टर क्षेत्र हे शैक्षणिक संस्थासाठी वाटप असून, हे क्षेत्र आहील्यानगर- मनमाड या राष्ट्रीय महामार्गा लगत येत असून, दळणवळणाच्या ददृष्टीने देहरे हे गाव जिल्हयाच्या मध्यावर आणि शहरापासून हाकेच्या अंतरावर आहे. सदर शसकीय जागेचा विचार झाल्यास देहरे व परिसरातील विळद,पिंपरी शिंगवे नांदगाव या गावांचा विकास अधिक जोमाने होण्यास हातभार लागेल, तसेच नगर मधील एमआयडीसी, आणि नवीन मंजूर झालेली एमआयडीसी दोन्ही पण जवळ आहेत,त्यामुळे खा. निलेश लंके यांनी त्रि-सदस्य समितीला या जागेची पाहणी करण्यासाठी व विचार करण्यासाठी शिफारस करावी असे म्हंटले आहे.
Post a Comment