खळबळजनक...सरपंच संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या?



मुंबई - बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी एका महिलेला तयार करण्यात आले होते. या महिलेची आठ दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केला आहे. या आरोपामुळे पुन्हा एकदा या प्रकरणी खळबळ उडाली आहे.
गुरुवार (दि.२७) मार्च रोजी द्वारका नगरी वसाहतीत एका महिलेचा मृतदेह तिच्या घरात सडलेल्या अवस्थेत आढळला होता. तिच्या मृत्यूबाबत वेगळे तर्कवितर्क लावण्यात आले. हा मृतदेह त्याच महिलेचा असल्याची चर्चा आहे. मनिषा बिडवे, मनिषा आकुसकर, मनिषा बियाणी, मनिषा गोंदवले या नावाने ती महिला वावरत होती.

विविध नावाने प्रसिद्ध असलेली ही महिला सुदर्शन घुलेच्या संपर्कात हत्या झाल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार होती. तसेच मृत महिलेची मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी चौकशी झाली होती, अशी देखील चर्चा आता समोर येऊ लागली आहे. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

दरम्यान, कुठल्या कारणाने हत्या झाली? आणि बीड पोलीसांना ही बातमी कळली तेव्हा ते घटनास्थळी पोहचल्या नंतरच तेथील रहिवासी व स्थानिक पोलिसांना कळली व अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबधातून हत्या झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे.

अंजली दमानियांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?

गुढ संपता संपत नाही आणि हत्या संपता संपत नाहीत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या?

संतोष देशमुखावर अनैतीक आरोप करण्यासाठी तयार आसलेली कळंब शहरातील द्वारका नगर मधे राहत आसलेल्या महिलेची हत्या झाल्याचे कळतय. या महिलेची ७ ते ८ दिवसापुर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. कुठल्या कारणाने हत्या झाली अन बीड पोलीसांना ही बातमी कळाली अन ते घटना स्थळी पोहचल्यावर नंतरच तेथील रहिवासी व स्थानिक पोलीसाना कळाली व अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतीक संबधातून हत्या झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे.

या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. असं असलं तरी शहर आणि परिसरात या घटनेने दहशत पसरली आहे. शहरातील द्वारका नगरीत राहणाऱ्या लोकांना २ दिवसांपासून उग्र वास येत होता. पन ज्या घरातून वास येत होता त्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. दरवाजा तोडून बीड पोलीस व स्थानिक पोलीसानी आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळला. व मृतदेह सडलेला आसल्यामुळे जागेवरच मृतदेहाचे पोष्टमार्टम केले व अंत्यविधी ही उरकला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

0/Post a Comment/Comments