मुंबई (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
शनिवारी (दि.२९) तुळजापूर आणि पंढरपूर येथील मंदिर परिसरात सुरु असलेल्या कामांची
पाहणी केली. या वेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवारांनी शेतकरी
कर्जमाफीवर केलेल्या विधानाचे समर्थन केले. तसेच अजित पवारांची जी भूमिका आहे,
तीच सरकारची असल्याचे ते म्हणाले.
सध्या शेतकरी कर्जमाफी
शक्य नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांना विचारले असता, त्यांनीही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ आगामी तीन वर्षे शेतकरी कर्जमाफी होणार
नाही, हे स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांनी शेतकरी
कर्जमाफीबाबत घेतलेली भूमिका योग्य आहे. अजितदादांची जी भूमिका आहे, तीच सरकारची भूमिका आहे. अजितदादांनी कधीही शक्य नाही, असे म्हटलेले नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
म्हणाले.
'वाघ्या'
कुत्र्याच्या शिल्पावरूनही सुनावले
वाघ्या कुत्र्या
संदर्भातील स्मृती स्थळावरून सगळ्यांशी चर्चा करावी लागणार आहे. त्यासाठी होळकर
यांनी पैसे दिले आहेत, हे सर्वांना माहिती आहे.
त्यामुळे या प्रकरणात सर्वांशी चर्चा करून, वाद न करता मार्ग
निघू शकतो. प्रत्येक गोष्ट वाद केलाच पाहिजे का? तर असे काही
नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
वाघ्या कुत्र्या
संदर्भातील स्मृती स्थळावरून वाद निर्माण करून काहीही होणार नाही. धनगर समाज
एकीकडे आणि मराठा समाज एकिकडे हे कशासाठी? हे अतिशय
अयोग्य आहे. या विषयावर बसून मार्ग काढता येईल, असे देखील
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
या संदर्भात बोलताना
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संभाजी महाराज
यांना अनेक वेळा भेटण्याची वेळ दिली आहे. ते माझ्याशी फोनवर देखील बोलतात. ते मला
येऊन देखील भेटतात. त्यामुळे त्यांना वेळ न देण्याचे काहीही कारण नसल्याचे फडणवीस
यांनी म्हटले आहे. वाघ्या कुत्र्याच्या स्मृती स्थळावरून युवराज संभाजीराजे यांनी
देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची वेळ मागितली असून त्यांची वेळ मिळाली नसल्याचे
म्हटले होते. मात्र ते मला कधीही भेटू शकतात, असे म्हणत
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा दावा फेटाळला आहे.
Post a Comment