एक वर्षाच्या मुलाला फाशी देऊन आईनेही केली आत्महत्या, नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना !


कर्जत (तालुका प्रतिनिधी) - कर्जत तालुक्यातील खांडवी येथे एक वर्षाच्या मुलाला फाशी दिल्यानंतर आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २२ जानेवारीला दुपारी घडली आहे. साक्षी कुमार कांबळे (वय २३) व स्वरूप कुमार कांबळे (वय १, दोघे रा. खांडवी, ता.कर्जत) अशी मृत्यू झालेल्या मायलेकाची नावे आहे.

दोनच दिवसांपूर्वी स्वरूप कांबळे याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी डीजे देखील लावण्यात आला होता. मयत साक्षी व कुमार कांबळे यांचा प्रेम विवाह होता. दोघेही आनंदाने राहत असताना अचानक राहत्या घरामध्ये साक्षी कांबळे या आईने पत्र्याच्या खाली असलेल्या लोखंडे अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

तत्पूर्वी तिने आपल्या एक वर्षाच्या मुलाला देखील गळफास देऊन मारले. याप्रकरणी मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील करत आहेत.

0/Post a Comment/Comments