नगर तालुका (प्रतिनिधी) – नगरच्या
एमआयडीसी परिसरात बोल्हेगाव फाट्याजवळ शनिवारी (दि.११ जानेवारी) सकाळी उघडकीस आलेल्या
तरुणाच्या खुनाचा गुन्हा एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही तासांत उघडकीस आणला आहे.
सदर खून नगर तालुक्यातील वाळूंज येथील भास्कर विठ्ठल देशमुख (वय ३७) याने केला
असून त्याला पोलिसांनी आष्टी तालुक्यातील वेलतुरी या गावात पकडले आहे. मयत अश्विन
कांबळे याने देशमुख यास दारू पिवून शिव्या दिल्याने त्याला राग येवून त्याने
त्याचा डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली आहे.
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी
फिर्यादी श्रीमती कल्पना अश्वीन कांबळे यांचे पती अश्विन मारुती कांबळे (वय ३६, रा.
जत्राट, ता. निपाणी, जि. बेळगाव, राज्य कर्नाटक) यास बोल्हेगाव फाटा येथील
अहिल्यानगर ते मनमाड हायवे रोडचे पुर्वस असलेले स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर शोरुम
जवळील पडीक मोकळया मैदानात कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन डोक्यात दगड
घालून जीवे ठार मारले होते. सदर बाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला बी.एन.एस कलम १०३
प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
घडलेल्या गुन्हयाची माहिती
प्राप्त होताच पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट देवून आरोपीचा शोध
घेवून गुन्हा उघडीस आणणेबाबत एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे स.पो.नि. माणिक चौधरी यांना
आदेशीत केले होते.
नमुद आदेशाप्रमाणे स.पो.नि.
चौधरी यांनी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे दोन पथक तयार करुन गुन्हयातील आरोपींची
माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले. गुन्हयाचे तपासात पथकाने तात्काळ
घटना ठिकाणी जावून आसपासचे साक्षीदाराकडे विचारपुस करुन तसेच तांत्रीक
विश्लेषणाच्या आधारे घटना ठिकाणाचे जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज चेक करुन आरोपीचा
शोध घेत असतांना स.पो.नि. चौधरी चौधरी यांना गुप्त बातमीदारमार्फत माहीती मिळाली
की, सदरचा गुन्हा हा भास्कर विठठल देशमुख (वय ३७ वर्षे, रा. वाळूंज, ता. नगर) याने केलेला असून गुन्हा करुन
आरोपी हा सध्या वेलतुरी, ता आष्टी जि.बीड येथे असलेबाबत
खात्रीशीर माहीती मिळाल्या नुसार स.पो.नि. चौधरी यांनी तपास पथकास माहिती देऊन
त्या दिशेने रवाना केले. तपास पथकाने आरोपी याचा वेलतुरी, ता
आष्टी जि. बीड येथे जावून शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून
गुन्हयाच्या अनुषंगाने विश्वासात घेवून विचारपुस केली असता आरोपी भास्कर देशमुख याने
सांगितले की, मयत अश्विन मारुती कांबळे याने दारु पिवून
शिवीगाळ केल्याने त्याचा राग आल्याने त्याच्या डोक्यात दगड घालून त्यास जीवे ठार
मारले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक
राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस
अधिकारी संपतराव भोसले यांचे मार्गदर्शनाखाली एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे स.पो.नि.माणिक
चौधरी, उपनिरीक्षक विनोद परदेशी, उपनिरीक्षक
विकास जाधव, उपनिरीक्षक मनोज मोंढे, पो.हे.कॉ.
नंदकिशोर सांगळे, नितीन उगलमुगले,
साबीर शेख, कावरे, राजु सुद्रीक,
पो.ना. महेश बोरुडे, पो.कॉ. किशोर जाधव,
सुरज देशमुख, जयसिंग शिंदे, नवनाथ दहिफळे, उमेश शेरकर, अक्षय
रोहकले, सानप, गवारे तसेच मोबाईल सेलचे
राहुल गुंडू यांच्या पथकाने केली आहे.
Post a Comment