मुंबई : मोहम्मद शमीचे आता
भारताच्या संघात तब्बल १४ महिन्यांनी पुनरागमन झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी २०
मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर झाली आहे. या संघात आता मोठे बदल करण्यात आले
आहेत. ऋषभ पंतला या संघात स्थान मिळालेले नाही. पण भारतीय संघाचे उपकर्णधारपद
यावेळी अक्षर पटेलला देण्यात आले असून हा सर्वांसाठी धक्का असेल. कारण यापूर्वी
अक्षरला अशी मोठी जबाबदारी देण्यात आली नव्हती. पण यावेळी प्रथमच त्याच्यावर ही
मोठी जबाबदारी सोपवली आहे.
सलामीला कोण येणार...
भारताचा हा टी २० संघ जाहीर
करताना बीसीसीआयने मोठे बदल करणे टाळले आहेत. या संघाचा कर्णधार सूर्याच असेल.
त्याचबरोब सलामीला येईल तो संजू सॅमसन. संजूला यावेळी साथ देण्यासाठी अभिषेक वर्मा
हा संघात आहे.
मधल्या फळीत कोणाला
संधी....
भारतीय संघाच्या मधल्या
फळीत यावेळी सूर्या तर असेलच, पण त्याला साथ देण्यासाठी
यावेळी तिलक वर्मा हा असेल. त्याचबरोबर रिंकू सिंग हा अखेरच्या षटकांमध्ये येऊन
मोठी फटकेबाजी करू शकतो.
तीन अष्टपैलू खेळाडूंना
संधी...
या भारताच्या संघात
तीनअष्टपैलू खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यामध्ये पहिला क्रमांक हा हार्दिक
पंड्या आहे. हार्दिकला यावेळी साथ देण्यासाठी ऑस्ट्रेलिया गाजवून आलेला नितीश
कुमार रेड्डी असणार आहे. हार्दिक आणि नितीश यांच्याबरोबर वॉशिंग्टन सुंदरलाही या
संघात कायम ठेवले आहे.
वेगवान गोलंदाजीची धुरा
कोणावर...
वेगवान गोलंदाजीची मुख्य
धुरा यावेळी मोहम्मद शमीवर असणार आहे. मोहम्मद शमीला साथ देण्यासाठी यावेळी संघात
अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा हे दोघे असतील.
फिरकी गोलंदाज कोण असतील...
भारताच्या या संघात
वॉशिंग्टन सुंदरला साथ देण्यासाठ वरुण चक्रवर्ती असणार आहे. त्याचबरोबर मिस्ट्री
स्पिनर असलेल्या रवी बिश्नोईलाही यावेळी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.
दोन यष्टीरक्षकांना संधी...
भारताने या संघात दोन
यष्टीरक्षकांना संधी दिली आहे. या संघाच पहिला यष्टीरक्षक संजू सॅमसन असेल, जो सलामीलाही येणार आहे. या संघातील दुसरा यष्टीरक्षक हा ध्रुव ज्युरेल
असणार आहे.
भारताचा संघ - सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उप कर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर).
Post a Comment