अहिल्यानगर (प्रतिनिधी) - दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न
प्रशासनातर्फे राज्यभर राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत येथील अन्न प्रशासनाच्या
अधिकार्यांनी अहिल्यानगर शहरातील दुध विक्री करणार्या आठ डेअरींवर छापेमारी
केली. कारवाईत दुधाचे 19 सर्वेक्षण नमुने
विश्लेषणासाठी घेतले आहेत. या नमुन्यांची तपासणी केली जाणार असून, यात भेसळ आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
राज्यभरात दुधाच्या भेसळीची प्रकरणे उघडकीस येत असून, यावर खबरदारीच्या उपाययोजना
म्हणून हाती घेण्यात आलेल्या मोहिमेअंती बुधवारी राज्यभरात दुधाचे सर्वेक्षण नमुने
घेण्याची मोहीम राबविली गेली. येथील अन्न प्रशासनाच्या दोन निरीक्षकांनी
अहिल्यानगर शहरासह सावेडी भागातील आठ डेअरीवर छापे टाकून पाऊचमधून व सुट्या स्वरूपातील
दुधाचे नमुने घेतले. यामध्ये गाय व म्हैस यांच्या दुधाचे मिळून 19 नमुने घेण्यात आले आहेत. ते नाशिक येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी
पाठविण्यात आले आहेत. तपासणीअंती त्यामध्ये भेसळ आढळून आल्यास संबंधित डेअरी
मालकांविरूध्द कारवाई केली जाणार असल्याचे येथील अन्न प्रशासनाच्या अधिकार्यांनी
सांगितले.
अहिल्यानगर शहरातील विशाल गणपती मंदिराजवळील गणेश घी डेपो, चर्च रस्त्यावरील कैलास डेअरी,
सबजेल चौकातील राहुल डेअरी, डावरे गल्लीतील
साई डेअरी, गुलमोहोर रस्त्यावरील सात्विक डेअरी, सावेडी उपनगरातील नायरा पेट्रोप पंपा जवळील समर्थ व त्रिमूर्ती डेअरी,
गुलमोहर रस्त्यावरील कबीर केक बेकरी या ठिकाणांहून दुधाचे नमुने
घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तेथील अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील
कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न प्रशासनाच्या अधिकार्यांनी सांगितले.
Post a Comment