प्रयागराज - ९० च्या दशकात करण अर्जुन, अक्षयकुमारचा
सबसे बडा खिलाडी, क्रांतीवीर, तिरंगासारख्या हिट चित्रपटातून बॉलीवूड गाजवणारी
अभिनेत्री ममता कुलकर्णी आता महामंडलेश्वर म्हणून आेळखली जाणार आहे. हे वाचून
कुणालाही आश्चर्य वाटेल, परंतु
पूर्वाश्रमीच्या या रुपेरी पडद्यावरील नायिकेने संन्यास स्वीकारला आहे. प्रयागराज
येथील कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या ममताची या अवतारातील छायाचित्रे जाहीर झाली
आहेत.
शुक्रवारी (दि.२४
जानेवारी) तिने संगमावर पिंडदान केले. आता ती यामाई ममता नंद गिरी म्हणून आेळखली
जाईल. तत्पूर्वी ५३ वर्षीय ममता किन्नर आखाड्यात पाेहाेचली. अंगावर भगवे कपडे, कपाळावर चंदनाचा टिळा, गळ्यात
रुद्राक्षाच्या माळा, खांद्यावर झोळी...संन्सासिनीच्या
वेशातील ममताची भेट आचार्य महामंडलेश्वर डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी
यांच्यासोबत झाली.
ममताने आचार्य
महामंडलेश्वर डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांचे आशीर्वाद घेतले. तेथे तासभर
चर्चा झाल्यानंतर आखाड्याने तिला ही महामंडलेश्वर पदवी प्रदान करण्याचे जाहीर
केले. २०१५ मध्ये सामाजिक कार्यकर्त्या व किन्नर नेत्या लक्ष्मी नारायण त्रिपाठीने
किन्नर आखाड्याची स्थापना केली हाेती. किन्नर समाजाला मुख्य प्रवाहाशी
जाेडण्यासाठी ताे सुरू केला.
ड्रग्ज प्रकरणात नाव
२०१६ मध्ये ममता कुलकर्णीचे नाव एका ड्रग प्रकरणात आले होते. २००० कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट आणि तस्करी करण्याच्या उद्देशाने एका गँगस्टरला मेथॅम्फेटामाइनच्या बेकायदा उत्पादनासाठी इफेड्रिनचा पुरवठा करणाऱ्या आरोपींमध्ये तिचे नाव समोर आले होते. ती तिचा साथीदार विकी गोस्वामी आणि इतर सहआरोपींसोबत जानेवारी २०१६ मध्ये केनियामध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग रिंगमध्ये एका बैठकीत सहभागी झाली होती.
कर्म-धर्मात कशा रमलात? तुमच्यात अचानक बदल कसा झाला?
- अचानक नाही.
२००० मध्ये मी तपाला सुरुवात केली. माझे गुरू श्री चैतन्य गगन गिरी नाथ आहेत.
त्यांच्याकडून मी दीक्षा घेतली हाेती. त्यांचा कुपाेलीत आश्रम आहे. २३ वर्षांपासून
माझी तपस्या सुरू आहे. आज शुक्रवार. आदिशक्तीचा दिवस. अर्धनारीश्वर स्वरूपाच्या
हातून महामंडलेश्वर बनणे. याहून माेठे भाग्य काय असेल. महाकालीचा आशीर्वाद आहे. ती
माझी आई आहे. आदिशक्ती व अर्धनारीश्वर स्वरूपाकडून माझा पट्टाभिषेक हाेत आहे याहून
माेठी गाेष्ट काय?
बाॅलीवूडमध्ये पुन्हा जाणार ?
- हे बघा, आता बाॅलीवूडशी माझा काही संबंध नाही. ते तर मी कधीचेच साेडलेले आहे. मी
बाॅलीवूडसाठी परतलेले नाही. २३ वर्षांनंतर भारतात आलेय. २०१३ च्या कुंभात आले
हाेते. १४४ वर्षांनंतर हा कुंभमेळा आला आहे. मी फक्त यासाठीच आले आहे. आता मला
महामंडलेश्वराची पदवी मिळतेय. यापेक्षा माेठे काय असू शकेल. आता मला काहीही नकाेय.
अध्यात्माकडे वळावे असे
२३ वर्षांपूर्वी काय घडले हाेते?
- महाकाल व
आदिशक्तीची इच्छा आहे. मला कालच महामंडलेश्वर बनण्याची संधी मिळाली हाेती. मी ते
व्हायचे की नाही यावर विचार करण्यासाठी एक दिवसाचा वेळ घेतला हाेता. किन्नर
आखाड्यात काही बंधन, अडकाठी नाही. तुम्ही स्वतंत्र राहू
शकता. धार्मिकदृष्ट्या तुम्ही काहीही करू शकता हे समजल्यावर मी हा निर्णय घेतला.
महामंडलेश्वरबद्दल काय
माहिती?
- पदवीपर्यंतचे
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयातून बाहेर पडून मास्टर (पदव्युत्तर) केले
जाते. मग विद्यापीठातून प्रमाणपत्र मिळते. तसेच महामंडलेश्वर प्रमाणपत्र आहे. २३
वर्षे तपस्या केली. आता मला पुरस्कार मिळाला आहे.
Post a Comment