नगर तालुक्यातील महिला सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर,९ पैकी ७ सदस्य गेले विरोधात


नगर तालुका (प्रतिनिधी) - कामाचा गैरवापर व पदाचा अनियमित वापर करून शासकीय कामाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत नगर तालुक्यातील भातोडी गावच्या महिला सरपंच सौ. ज्योती विक्रम लबडे यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव २१ जानेवारीला झालेल्या विशेष सभेत मंजूर झाला आहे. ग्रामपंचायतच्या  एकूण ९ पैकी ७ सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने मतदान केले आहे.

अहिल्यानगरचे तहसीलदार संजय शिंदे यांच्यासमोर ही सर्व प्रक्रिया पार पडली. सरपंच सौ.ज्योती विक्रम लबडे यांच्या विरोधात ७ सदस्यांनी अविश्वास ठराव १६ जानेवारीला तहसीलदारांकडे दाखल केला होता. त्यावर तहसीलदार शिंदे यांनी २१ जानेवारीला ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांची विशेष सभा बोलावली होती.

या सभेत उपसरपंच राजू पटेल, ग्रामपंचायत सदस्य सुभाष घमाजी कचरे, सुनिता विक्रम गायकवाड, सुनिता जालिंदर लबडे, कैलास कुशाबा गांगर्डे, मुमताज शाकीर मुलानी, उल्फत युनुस पटेल या ७  सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने स्वाक्षऱ्या केल्या आहेत. महिला सरपंच असल्याने  एकूण ९ पैकी ७ सदस्यांनी अविश्वास ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या. तसेच लक्ष्मण फकीरा लबडे हे सदस्य अनुपस्थित होते. त्यामुळे सरपंच लबडे यांच्या बाजूने त्यांचे स्वताचेच मत राहिले.  त्यामुळे हा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत कारभार करताना सदस्यांना सरपंच ज्योती लबडे या कोणत्याही कामाबाबत विश्वासात घेत नव्हत्या.  कामाबद्दल विचाराना केली असता अरेरावीची भाषा वापरायच्या. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचे दिसून येत होते. यामुळे आम्ही सर्वजण अविश्वास ठरावाच्या बाजूने आहोत. असे या सदस्यांचे म्हणणे आहे.

0/Post a Comment/Comments