नगर - प्रो कबड्डी मध्ये मुलींना आता चांगली संधी आहे. यामधून मुलींचे चांगले करीअर घडणार आहे. चांगले करीअर करायचे असेल शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. कबड्डी खेळात नेहमी सातत्य ठेवले पाहिजे. प्रत्येक सामना हा अंतिम सामना आहे अशा पद्धतीने खेळले पहिजे असे प्रतिपादन नगर ग्रामीण विभागाचे पोलीस उपअधीक्षक संपत भोसले यांनी केले.
सांगली येथे नुकत्यात मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत नगर जिल्हा संघाने तिसरा क्रमांक मिळवला, या बददल त्यांचा नगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे, अजित देवकर, क्रीडा अधिकारी अजय पवार, विजय मिस्कीन, शंतनू पांडव, प्रकाश बोरुडे, बाळासाहेब कडूस, गिरीश जाधव, कैलास पठारे, विनायक भुतकर, यावेळी उपस्थित होते.
यावेळी प्रा. गाडे म्हणाले खेळात चांगल्या खेळाडूना संधी दिली पाहीजे. संघ निवडताना चुकीचा खेळाडू निवडला तर संघाचे नुकसान होते. आहिल्यानगर संघ कबड्डी खेळात चांगली कामगिरी करत आहे. नुकत्याच झालेल्या नॅशनल प्रो कबड्डी मध्ये आपल्या जिल्हयाचे खेळाडू खेळले. ६९ वर्षानंतर मुलांनी कबड्डीमध्ये चांगले यश मिळवले. तर मुलींनी ५१ वर्षानंतर चांगली कामगिरी केली. येणाऱ्या कबड्डी सामन्यात आहिल्या नगरचा संघ प्रथम क्रमांकाने विजयी होईल. संघाची कर्णधार वैष्णवी काळे नी खेळात यशस्वी नियोजन केले.
यावेळी फैय्यद शेख ,कार्तिक फडतरे, ऋतुजा टिक्कल ,काजल थोरात, वैष्णवी वोटकर, शुगुप्ता शेख, स्नेहा पवार, अक्षदा यादव, पार्वती तडवी, कर्णधार वैष्णवी काळे, भाग्यश्री पालवे, शुभांगी जोशी, सुवर्ण लोखंडे, निवड समितीचे संतोष घोरपडे, संतोष ढेरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कैलास पठारे यांनी केले तर आभार सुधाकर सुंबे यांनी मानले.
Post a Comment