'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' उपक्रमास शालेय विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद



अहिल्यानगर -शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या वतीने वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी नववर्षाच्या मुहूर्तावर ' वाचन संकल्प महाराष्ट्राचा ' अहिल्यानगर तालुक्यातील कामरगाव येथील कामक्षा माता सार्वजनिक वाचनालयात व्यापक उपक्रम राबविण्यात आला.  

प्रथम ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन कामरगाव इंग्लिश स्कूल कामरगाव चे मुख्याध्यापक नामदेव जठार यांच्या हस्ते करण्यात आले, समवेत ज्येष्ठ शिक्षक जालिंदर वेताळ आणि इयत्ता सातवी विद्यार्थी /विद्यार्थिनी उपस्थिती ग्रंथ प्रदर्शन,वाचन संवाद, पुस्तक वाचन दि.०१/०१/२०२५ रोजी  वाचनालयात राबविण्यात आले. हा उपक्रम दिनांक १/१/२०२५ ते १५/१/२०२५  पर्यंत राबविला जात आहे. 

पहिल्या दिवशी इयत्ता सातवी चे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला उत्कृष्ट असे दोन तास वाचन करून पुस्तकाविषयी वाचन,लेखन, पुस्तक परिचय या बाबत आणि शासनाच्या उपक्रमाबद्दल जालिंदर वेताळ यांनी माहिती दिली. असेच पंधरा दिवस हा उपक्रम राबविले जाणार आहे विशेषतः विद्यालयाचे मुख्याध्यापक नामदेव जठार व शिक्षक जालिंदर वेताळ, गोंगे सर, गायके मॅडम, कांबळे सर, फराटे मॅडम, जपे मॅडम, भुजबळ मॅडम, कातोरे मॅडम, जठार मॅडम व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहकार्य करीत आहेत. कार्यक्रम यशस्वीपणे वाचनालयाचे ग्रंथपाल कुमारी पल्लवी वेताळ व सहाय्यक यश वेताळ यांनी परिश्रम घेतले.

ग्रंथ प्रदर्शन, वाचन संवाद, पुस्तक वाचन या उपक्रमात कामरगाव इंग्लिश स्कूल कामरगाव येथील सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा हेतू ठेवून वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजन करण्यात येणार आहे. २६ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व योग्य बक्षीस देण्यात येईल. - सुखदेव वेताळ - संस्थापक, कामक्षा माता सार्वजनिक वाचनालय,कामरगाव

0/Post a Comment/Comments