पारनेरच्या रांजणगाव मशीद मध्ये तरुणावर केले तलवारीने सपासप वार, 'हे' कारण आले समोर


 
पारनेर (प्रतिनिधी) - पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद या गावात एका व्यक्तीने २४ वर्षीय तरुणावर तलवारीने सपासप वार करत त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि.२१ जानेवारी) दुपारी १२.३० च्या सुमारास घडली आहे. या तलवार हल्ल्यात सतीश गोरख जवक (वय २४, रा. रांजणगाव मशीद, ता.पारनेर) हा वाहनचालक गंभीर जखमी झाला आहे. 

या प्रकरणी शरद उर्फ सदानंद गंगाधर जवक (वय ३३, रा. रांजणगाव मशीद, ता.पारनेर) याच्या विरुद्ध सुपा पोलिस ठाण्यात हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सदर घटना ही आरोपी शरद जवक याच्या घरासमोर घडली. मंगळवारी दुपारी १२.३० च्या सुमारास सतीश जवक हा शरद जवक याच्या घरासमोर आला व त्याने शरद ची पत्नी कावेरी हिला विचारले शरद कोठे आहेत. त्यावेळी त्या म्हणाल्या घरात झोपले आहेत. असे म्हणाले असता फिर्यादी सतीश त्यांना म्हणाला मी तुमच्या बोरीचे बोर घेवुन जावु का? त्यावर त्यांनी घ्या म्हणून सांगितले. 

त्याचा त्याला राग येवुन शरद हा घरातुन उठुन येवुन माझे घरी का आला या कारणावरून मनात राग धरून फिर्यादी सतीश यांना काही न बोलता त्याचे हातातील तलवारीने जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी सतीश यांचे मानेवर वार केला, तो वार वाचविण्यासाठी फिर्यादीने डाव्या हाताने बचाव केला असता फिर्यादी यांचे हाताला जखम झाली तसेच फिर्यादी यांचे मानेजवळ उजवे बाजुस जबर जखम झाली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी शरद जवक वर गुन्हा दाखल केला असून त्याला मंगळवारी रात्री उशिरा अटक केली आहे.

0/Post a Comment/Comments