हैदराबाद - दक्षिणेसह बॉलिवूडवर वेगळी छाप उमटवणारा पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. हैदराबादेत झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक झाली आहे.
हैदराबादेत झालेल्या या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल झाला होता. शुक्रवारी (दि.१३) त्याला चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या घडामोडींमुळे चित्रपटसृष्टीला धक्का बसला असून आता अल्लू अर्जुनवर काय कारवाई होणार? याची चर्चा सुरू झाली आहे.
पुष्पा-२ रिलीज होत असताना अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तविक अल्लू अर्जुन बुधवारी (दि.४ डिसेंबर) रात्री हैदराबादमधील एका लोकल संध्या थिएटरमध्ये पोहोचला होता. त्याला पाहण्यासाठी गर्दी जमली. अचानक चेंगराचेंगरी झाली, त्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. यानंतर अल्लू अर्जुन आणि संध्या थिएटरवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अल्लू अर्जुन कोणतीही माहिती न देता तेथे पोहोचल्याचे सांगितले जात आहे. तसेच संध्या थिएटरने कार्यक्रमाचे योग्य व्यवस्थापन केले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. हैदराबाद उपपोलिस आयुक्तांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले- कलाकार चाहत्यांना भेटण्यासाठी थिएटरमध्ये येत असल्याची कोणतीही माहिती पोलिसांना नव्हती. मात्र, थिएटरवाल्यांना हे माहीत होते. त्यांनी किमान गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य व्यवस्था करायला हवी होती.
Post a Comment