श्री राम देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष पदी शिवहरी म्हस्के यांची बहुमताने निवड



नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील दहिगाव येथील ऐतिहासिक तिर्थक्षेत्र 'क"वर्ग श्री राम देवस्थानच्या  पब्लिक ट्रस्टच्या अध्यक्ष पदी शिवहरी म्हस्के,  उपअध्यक्ष पदी मोहन निमसे, कोषाध्यक्ष पदी बाबासाहेब बनकर, सरचिटणीस पदी कचरू गायकवाड, यांची बहुमताने निवड झाली आहे.

नाना गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राजेंद्र हंबर्डे यांच्या उपस्थितीत हि  निवड करण्यात आली  न्यासाचे  वंशपरंपरा विश्वस्त  अनंत द्रविड,रघुवीर द्रविड, उपस्थित होते.ट्रस्ट देवस्थानचे एकुण विश्वस्त अकरा आहे. नागेश वाघ, मधुकर म्हस्के,आजिनाथ म्हस्के, गौतम हंबर्डे, संजय सावंत असे विश्वस्त आहे.

या वेळी माजी सरपंच नामदेव म्हस्के, माजी अध्यक्ष ॲड पोपट म्हस्के, खरेदी विक्री संघ मा.संचालक जयंतवत शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अमिर शेख, प्रा. रवींद्र हंबर्डे, ग्रामपंचायत सदस्य जावेद शेख, ट्रस्ट माजी अध्यक्ष राजेंद्र हंबर्डे,माजी सरपंच सुनिल म्हस्के, अंबादास म्हस्के, सुदाम बनकर, सेवा सोसायटी चेरमन दत्तात्रय बनकर, विश्वनाथ शिंदे, ग्रामपंचायत सदस्य राहुल पोटरे, गणेश हिंगे, एकनाथ आगळे, मोहंमद सय्यद, गोरख म्हस्के,विनायक वाघ,आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments