अहिल्यानगर (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अकोळनेर (ता.नगर) केंद्राची विविध गुणदर्शन स्पर्धा घोसपुरी या ठिकाणी घेण्यात आली होती. यामध्ये पहिली दुसरी किलबिल गट व तिसरी चौथी बालगट यांनी सहभाग घेतला. या सर्व गटात सारोळा कासार गावठाण शाळेने घवघवीत यश मिळविले आहे. अकोळनर केंद्रात किलबिल गट व बालगट यामध्ये सर्वाधिक बक्षिसे मिळवण्याचा मान सारोळा कासार शाळेने मिळवला आहे.
किलबिल गटात वकृत्व स्पर्धेत शिवंन्या पवन कडूस व बालगटामध्ये श्रद्धा दीपक कडूस दोघींनीही प्रथम क्रमांक मिळविला आहे. बालगटात गोष्ट सादरीकरण यात श्रद्धा दीपक कडूस तर वेशभूषा सादरीकरण यात रुंजी जीवन हारदे यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याचप्रमाणे किलबिल गट वेशभूषा चिंतन भाऊसाहेब पाटील, बालगट वैयक्तिक गीत गायन रुंजी जीवन हारदे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
किलबिल गट हस्ताक्षर स्पर्धेत अनिशा आशिष गट तृतीय क्रमांक तसेच सांस्कृतिक व समूहगीत कार्यक्रमांमध्ये शाळेचा तृतीय क्रमांक आला आहे. यातील शिवंन्या पवन कडूस, श्रद्धा दीपक कडूस, रुंजी जीवन हारदे या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय चार विविध गुण दर्शन स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती, पालक व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे. मुलांची उत्कृष्ट तयारी करून घेण्यासाठी आदर्श व उपक्रमशील शाळेचे मुख्याध्यापक वैजीनाथ धामणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक सौ. ज्योती वैजीनाथ धामणे, बाबासाहेब धामणे व श्रीमती सविता लोंढे, श्रीमती महिमा नगरे यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment