शाळेत खेळताना जखमी झालेल्या विद्यार्थीनीला मिळाला उपचाराचा खर्च


नगर - महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी अपघात विमा योजनेतून नगर तालुक्यातील तुकाई मळा प्राथमिक शाळा (केंद्र-गुंडेगाव) येथील कु. अक्षरा अनिल भापकर या अपघातातग्रस्त पात्र विद्यार्थीनीच्या बचत खात्यात शिक्षणाधिकारी, योजना कार्यालय अहिल्यानगर यांच्याकडून मदतीची रक्कम जमा करण्यात आली असून पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

शालेय विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास, अवयव निकामी झाल्यास अथवा दुर्दैवाने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास शासनाच्या राजीव गांधी अपघात विमा योजनेतून विद्यार्थी व पालकांना औषधोपचार, शस्त्रक्रिया व मदत म्हणून दिड लाखांपर्यंत अर्थसहाय्य केले जाते. नुकत्याच शिक्षणाधिकारी योजना कार्यालय अहिल्यानगर यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली.

नगर तालुक्यातील तुकाई मळा प्राथमिक शाळा (केंद्र-गुंडेगाव) येथील कु. अक्षरा अनिल भापकर या विद्यार्थीनीचा दि.१ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी शाळेत खेळताना अपघात झाला होता. तिच्यावर शस्रक्रिया करण्यात आली होती. तिच्या उपचारासाठी रुग्णालयात झालेल्या खर्चाची फाईल करून शाळेतील शिक्षक विजय कडूस यांनी या विद्यार्थिनीच्या उपचाराचा खर्च मिळावा म्हणून प्रस्ताव सादर केला होता. त्यास मंजुरी मिळून सदर योजनेचा नुकताच लाभ मिळाला.

या कामी शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, उपशिक्षणाधिकारी संजयकुमार सरवदे, विस्तार अधिकारी रविंद्र थोरात, गटशिक्षणाधिकारी नगर तालुका बाबुराव जाधव , विस्तार अधिकारी सौ. मंदा माने-जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ सहाय्यक सौ पल्लवी तुंगार, विषयतज्ञ सुधिर लांडगे, सौ. माया हराळ, संजय शेलार यांनी विशेष परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य केले. शासनाच्या या योजनेबाबत गुंडेगाव व परिसरातील ग्रामस्थ, पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

0/Post a Comment/Comments