दिल्ली - भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला. शोएब मलिक याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. शोएब याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबतच्या लग्नाचे फोटो थेट सोशल मीडियावर शेअर केले. यानंतर लोक त्याला खडेबोल सुनावताना दिसले. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचे लग्न २०१० मध्ये हैद्राबादला झाले. लग्नाच्या अगोदर काही वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर लग्न केले.
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा एक मुलगा असून घटस्फोटानंतर सानियाच त्याचा सांभाळ करते. शोएबच्या घटस्फोटानंतर काही दिवस सानिया तणावात असल्याचे तिच्या पोस्टवरून स्पष्ट दिसत होते. दुबईमध्ये सानियाचे आलिशान घर असून तिथे ती आपल्या मुलासोबत जास्त वेळ घालवते. आता शोएब मलिक याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर सानियाच्या आयुष्यात मोठी आनंदाची उधळण आल्याचे बघायला मिळतंय. याबद्दलची पोस्ट सानियाने शेअर केलीये.
सानिया मिर्झाने टेनिसमधून निवृत्ती घेतलीये. तरीही ती या खेळात आपले योगदान देते. आता त्याबद्दलच तिचा गाैरव करण्यात आलाय. सानियाला मोठी जबाबदारी देण्यात आलीये. विशेष म्हणजे यावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह हा देखील उपस्थित होता. यावेळी या दोघांचा सन्मान करण्यात आला. सानिया मिर्झा आणि हरभजन सिंह यांना दुबईचे स्पोर्ट्स अॅम्बेसिडर बनवण्यात आलंय.
यावेळी अनेक अधिकारी देखील उपस्थित होते. दुबईसह सानिया मिर्झाचे हैद्राबादला देखील घर आहे. सानिया मिर्झा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सानिया दिसते. सानिया मिर्झाचे नाव मोहम्मद शमी याच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून जोडले जातंय. हेच नाही तर मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा एकमेकांना डेट करत असल्याची देखील चर्चा होती. मात्र, यावर दोघांनीही भाष्य केले नाही.
Post a Comment