नगर
(प्रतिनिधी) – श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीत बंडखोरी करून
अपक्ष उमेदवारी करत असलेले माजी आमदार राहुल जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद
पवार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे ते करत असलेला शरद पवार यांचा
आशीर्वाद असलेला दावा खोटा ठरला आहे.
श्रीगोंदा
– नगर मतदार संघात महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाला जागा सोडत अनुराधा नागवडे
यांना उमेदवारी दिली. त्यानंतर शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप यांनी अपक्ष
उमेदवारी करत आपल्याला शरद पवार यांचा आशीर्वाद असल्याचा प्रचार सुरु केलेला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी रविवारी
(दि.१७) पत्रक काढून माजी आमदार राहुल जगताप यांना पक्षातून निलंबित केले आहे.
यामुळे
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अनुराधा नागवडे यांच्या पाठीशी असल्याचे
स्पष्ट झाले आहे.
Post a Comment