नगर (प्रतिनिधी)- पारनेर नगर विधानसभा मतदार संघात नगर दक्षिणचे विद्यमान खासदार निलेश लंके यांच्या पत्नी व महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके पराभूत झाल्या आहेत. तेथे महायुतीतील राष्ट्रवादी अजित दादा गटाचे उमेदवार काशिनाथ दाते हे विजयी झाले आहेत. या मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी केलेली बंडखोरी तसेच शेवटच्या टप्प्यात अपक्ष उमेदवार माजी नगराध्यक्ष विजुभाऊ यांनी दिलेला पाठींबा दाते सरांना विजया पर्यंत घेवून गेला आहे. दाते यांना ईव्हीएम वर लंकेंच्या पेक्षा २४०६ मते जास्त मिळाली आहेत.
पारनेर मतदार संघात सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात प्रचंड चुरशीची झाली. दाते यांना लाडकी बहिण योजना फायदेशीर ठरणार की लंके यांना मोहटादेवी दर्शन यात्रा तारणार? अशी चर्चा मतदार संघात सुरु होती. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून प्रत्येक फेरीत दाते यांना काहीशी आघाडी मिळत होती तर त्यानंतरच्या फेरीत ती कमी होत होती. त्यामुळे १५ फेरी पासून ते थेट शेवटच्या २७ व्या फेरी पर्यंत काय होईल याची उत्सुकता कायम होती. अखेर २७ व्या फेरी अखेर दाते यांना २४०६ मतांची आघाडी मिळाली व त्यांचा विजय सुकर झाला.
पारनेर मतदार संघ उमेदवारांना ईव्हीएम वर पडलेली मते
काशिनाथ दाते (राष्ट्रवादी अजित पवार)- १ १२ ७७५
राणी लंके (राष्ट्रवादी शरद पवार)- १ १० ३५९
संदेश कार्ले (अपक्ष )- १० ६४५
विजयराव औटी (अपक्ष)- २४६४
विजुभाऊ औटी (अपक्ष)- ८५८
अविनाश पवार (मनसे)- ९६८
सखाराम सरक (रासप)- ३५७२
भाऊसाहेब जगदाळे (भारतीय जवान पार्टी)- १०७१
अविनाश थोरात (अपक्ष)-३७४
प्रवीण दळवी (अपक्ष)-१४२
भाऊसाहेब खेडेकर (अपक्ष)-७६५
रवींद्र पारधे (अपक्ष)-९५४
नोटा - ९३९
Post a Comment